। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रयत्नाने शुक्रवार (दि.8) पासून लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. ग्रुप ग्रामपंचायत भातसई आणि पंचक्रोशीमध्ये शुक्रवारी (दि.8) ग्रामपंचायत कार्यालयात कोव्हीशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात येणार आहे.
यामध्ये भातसई, कोपरे, लक्ष्मीनगर, झोळंबे, शेणवई, शेनवईवाडी, डोगरी, वावे पोडगे, वावेखार, सानेगाव, यशवंतखार, करंजविरा, दापोली, धोंडखार आदी गावांचा समावेश असणार आहे.या मोफत लसीकरणाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे. शेकापच्या माध्यमातून या आधी मोफत लसीकरणाचे 3 टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात येत आहे.
शनिवार (दि. 9) रोजी नवेदर बेली आणि आक्षी ग्रामस्थांसाठी लसीकरण तर 10 ऑक्टोबरला रामराज विभागात भिलजी-बोरघर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी लसीकरण केले जाणार आहे. 11 ऑक्टोबरला रोहा तालुक्यातील धोंडखार (दापोली) या गावाचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली.
शेकापच्या लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू

Coronavirus Vaccine bottle Corona Virus COVID-19 Covid vaccines panoramic bottles