1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक

कंगनाच्या विधानावरून नवा वाद
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौत आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालंफ, असं विधान कंगनाने केल.


टाइम्स नाऊच्या समिट 2021 मध्ये तिने केलेल्या या विधानावरून सोशल मीडियावर टीकाटिप्पणी होत आहे. सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहीत होतं, की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं; पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं, असं कंगना म्हणाली. तिच्या या वक्तव्याबद्दल तिचा अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान देणार्‍यांचा हा अपमान असून, तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.

Exit mobile version