पळून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील मार्केट यार्ड भागात असलेल्या बालसुधार केंद्रातील एक बालक कर्जत रेल्वे स्थानकात मध्यरात्री बसून असलेला रेल्वे पोलिसांच्या नजरेस पडला. त्याची चौकशी केली असता तो बालसुधार केंद्रातून पळून जाण्यासाठी निघाला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या बालकाला पुन्हा बाल सुधार केंद्रात पुन्हा रवानगी केली.

20जुलै रोजी कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील राबरी पॉइंट येथे ड्युटी असणारे होमगार्ड हिंदोळा आणि डाके यांना लक्ष्मण संतोष पवार हा 15 वर्षेचा मुलगा दिसून आला. रात्री दोन वाजता फिरताना दिसल्याने त्यास पोलीस ठाण्यात ठाणे येथे आणले आणि पोलीस अंमलदार पेडणेकर यांच्या समोर चौकशी केली. सदरचा मुलगा हा बालसुधारगृह कर्जत येथून पळून आल्याची आणि त्याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक कुलथे यांच्यासह कर्जत पोलीस ठाणे येथे नेले.तेथे कर्जत ठाणे अंमलदार सानप यांच्य ताब्यात दिले आणि बालसुधार केंद्राचे काळजीवाहक रमेश ठमके यांना बोलावून घेतले. त्यानंतर कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी सदर बालकास रमेश ठमके यांच्या ताब्यात दिले आहे.

Exit mobile version