जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडले

चार महिन्यांनतर सापडला मुहूर्त; पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंद
| आगरदांडा | प्रतिनिधी |
पर्यटकांना मुरूडचे खास आकर्षण असणाऱ्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पुरातत्व विभागाने उघडले आहेत. पावसाळ्याच्या चार महिन्यांनी जंजिरा किल्ला पर्यटनासाठी खुला करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुंगरे यांनी किल्ल्याचा दरवाजा उघडल्याने पर्यटकांसह स्थानिक व्यवसायिकांची प्रतिक्षा संपली आहे.

रविवारी हवामान अचानक बदलल्याने किल्ल्याचा दरवाजा न उघडण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला.यामुळे पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांचा हिरमोड झाला. परंतु सोमवारी सकाळी हवामान चांगले झाल्याने किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची वाहतुक सुरू करण्यात आल. सध्या पर्यटकांची संख्या तुरळक असुन धिम्या गतीने वाहतुक सुरू करण्यात आली आहे.

किल्ला रविवारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु वादळामुळे किल्ल्याचे दरवाजे उघडले नाहीत. सोमवारी किल्ल्याचे दरवाजे उघडण्यात आले. आहेत. येणाऱ्या पर्यटक किंवा तालुक्यातील नागरिकांनी बोटीतून उतरताना व किल्ला पाहताना काळजी घ्यावी तसेच सेल्फी काढताना विचार कराव . तोफांवर बसुन नका , भिंतीवर चढु नका , पुरातत्व वस्तूंचे जतन करा.किल्लाचा इतिहास मराठी,हिंदी व इंग्रजीमध्ये पहिल्या दरवाजाजवळ आणि किल्ल्याच्या मध्यभागी असे दोन ठिकाणी लावण्यात आला आहे. असे पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी सांगितले.

Exit mobile version