| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण नवी मुंबईतील अष्टगंध कला मंचाचे विनोदी कलाकार रोशन घरत आणि सहचारणी भाग्यश्री घरत यांना यंदाचा, नाट्यकलेतील द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर रावे- पेण येथील नाट्य कलाकार व कविवर्य अरुण पाटील यांनाही यंदाच्या द्रोणागिरी भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दरम्यान, अष्टगंध कलामंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, नाटककार हसूराम पाटील, नाटककार धनेश्वर म्हात्रे, रमेश कोळी, दत्तात्रेय घरत, प्रसाद कडू, वैशाली मोहिते, चेतन पाटील, निकिता पाटील, परेशा सरोदे, जयकिसन मोकल, दिगंबर कोळी यांच्यासह अन्य नाट्य कलाकारांनी या द्रोणागिरी भूषण पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. द्रोणागिरी स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष महादेव घरत यांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्षे हा युवा महोत्सव भरविला जात आहे. या महोत्सवात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक अशा विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जातो. दरम्यान, बोकडविरा चारफाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, द्रोणागिरी स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष महादेव घरत यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून या महोत्सवाला शोभा आणली.
घरत दाम्पत्यास द्रोणागिरी भूषणने सन्मानित
