तर मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमधून पैसा मागण्याचा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई । वार्ताहार ।
सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . जर मुलीने तिच्या वडिलांसोबत कोणत्याप्रकारचं नातं ठेवलं नसेल तर तिला वडिलांकडून पैसे मागण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्टपणे सांगितलं आहे की जर मुलांनी आपल्या वडिलांशी कोणतंही नातं ठेवलं नसेल, ते त्यांच्या संपर्कात नसतील तर त्यांना वडिलोपार्जित संपत्तीमधून पैसा मागण्याचाही अधिकार राहत नाही. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती किशन कौल आणि एम.एम. सुंदरेश यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिलाय.
सर्वोच्च न्यायालयामधील दोन न्यायाधिशांनी निकाल देताना स्पष्टपणे सांगितलं आहे की जर मुलीने बराच कालावधीसाठी आपल्या वडिलांशी कोणत्याप्रकारचं नातं ठेवलेलं नसेल तर तिला आपल्या वडिलांकडे पैसे मागण्याचा अधिकारही राहत नाही. या प्रकरणामध्ये महिला २० वर्षांची असताना आपला मार्ग स्वत: निवडण्यासाठी वडिलांपासून दूर गेली. त्यानंतर तिने वडिलांशी कोणताही संबंध ठेवला नाही. आता ही मुलगी पुढील शिक्षणासाठी वडिलांकडून पैशांची मागणी करत आहे. मात्र न्यायालयाने तिला असं करता येणार नाही असा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने या मुलीचं वय तिला आयुष्यामध्ये पुढील निर्णय घेण्याचं स्वांत्र्य देतं असं निरिक्षण नोंदवलं. मात्र असं असलं तरी तिला याचिकाकर्त्याकडून पैसे मागता येणार नाहीत असंही न्यायालयाने म्हटलंय.

Exit mobile version