ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारी गटांची उपांत्य फेरीत धडक

। भिवंडी । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्हा कबड्डी असो. ने उजाळा क्रीडा मंडळाच्या सहकार्याने आयोजित 66व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील कुमारी गटाच्या उपांत्य फेरीत धडक दिली. रा.फ.नाईक विरुद्ध राजश्री शाहू आणि ज्ञानशक्ती युवा विरुद्ध किल्ले माऊली अशा कुमारी गटात उपांत्य लढती होतील. भिवंडी-वळगांव येथील जाईबाई काशीनाथ पाटील क्रीडानगरीत सुरू असलेल्या कुमारी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत नवी मुंबईच्या रा.फ.नाईकने ठाण्याच्या स्फूर्ती मंडळाचा प्रतिकार 43-25 असा सहज संपुष्टात आणला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत रा.फ.नाईक संघाने पूर्वार्धातच 26-06 अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया घातला. ज्ञानशक्ती युवा संघाने राजश्री शाहू(ब) संघाचा 48-11 असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. मानसी गायकर, सायना गायकवाड यांच्या चढाई-पकडीच्या तुफानी खेळाच्या जोरावर ज्ञानशक्ती युवाने दोन लोण देत विश्रांतीला 27-5 अशी भक्कम आघाडी घेत विजयाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते. शेवटचा सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला त्यात किल्ले माउलीने श्री समर्थचा कडवा प्रतिकार 30-25 असा मोडून काढला. मध्यांताराला दोन्ही संघ 15-15 अशा समान गुणांवर होते. त्यामुळे उत्तरार्धात सामन्यात अधिक चुरस पहावयास मिळाली.

Exit mobile version