। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
सध्याच्या आधुनिकतेच्या युगात सर्वच विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात. या अशाच काहीस नवीन व वेगळं करू पाहणाऱ्या रायगड जिल्हा परिषद पेझारी शाळेत शिकणारी विद्यार्थ्यांपैकी कु. जान्हवी वासुदेव पाटील हि इयत्ता आठवी मध्ये शिकत असून ती जपानी भाषा शिकत आहे.
शेकापचे मा. आमदार जयंत पाटील व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते जान्हवी वासुदेव पाटील या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.