गणित संबोध परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेतील विद्यार्थ्यांनी रायगड गणित संबोध परीक्षा 2023-24 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या परिक्षेत सर्व विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. याचबरोबर इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी संस्कृती कृष्णा खराडे ही सुधागड तालुक्यात प्रथम आली असून तिला शिष्यवृत्ती मिळाली आहे.
आज झालेल्या सुधागड गणित मंडळामार्फत बक्षीस वितरण सोहळ्यात सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे व सर्व गणित अध्यापक मंडळ सदस्यांमार्फत संस्कृतीला तिच्या या यशासाठी अभिनंदन करण्यात आले. तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र समारंभपूर्वक देण्यात आले. नेणवली शाळेचे हे यश शाळेच्या शिक्षकांच्या कठोर मेहनतीचे आणि विद्यार्थ्यांच्या निष्ठावान प्रयत्नांचे फळ आहे. शाळेने गणिताच्या अभ्यासासाठी विविध उपक्रम राबवले होते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषय अधिक प्रभावीपणे समजून घेण्यास मदत झाली. सुधागड तालुक्यात प्रथम संस्कृती कृष्णा खराडे ही सुधागड तालुक्यात प्रथम आल्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन केले. तिच्या या यशाने संपूर्ण तालुक्याचे नाव उंचावले आहे, असे उपस्थितांनी सांगितले.