| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील श्रीमती गीता द. तटकरे तंत्रनिकेतन गोवे कोलाड या डिप्लोमा कॉलेजला जिल्हा कौशल विकास केंद्रामार्फत उत्कृष्ट केंद्र म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग कार्यालयामार्फत 2024-25 शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना कार्यान्वित करण्यासाठी पहिल्याच वर्षी मोलाचे योगदान देत असल्याने कोलाड येथील तटकरे तंत्रनिकेतन डिप्लोमा कॉलेजचा उत्कृष्ट केंद्र प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी विनायक पोटफोडे तसेच सर्व प्रशिक्षकांनी मेहनत घेतली. त्याबाबद्दल तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, प्राचार्य विपुल मसाल, रजिस्ट्रार अजित तेलंगे, प्राचार्य हजारे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.