सोन्याची झळाळी उतरली

 नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सोन्याच्या दरात   घसरण सुरुच आहे. सराफा बाजारात  सोमवारी  24 कॅरेट सोन्याचा दर 46,185 (प्रति 10 ग्रॅम) रुपयांवर आला. तर चांदीचा दरही प्रति किलोमागे 1,256 रुपयांनी घसरला.  24 कॅरेट सोने (प्रति 10 ग्रॅम) 46,185 रुपये, 23 कॅरेट सोने 46,000 रुपये, 22 कॅरेट सोने 42,305 रुपये, 18 कॅरेट 34,639 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 27,018 रुपये होता.  तर चांदी प्रति किलो 59,875 रुपये होती. 17 सप्टेंबर रोजी चांदीचा दर 61,131 रुपयांवर होता

Exit mobile version