सरकारची योग्य दिशेने वाटचाल

राकेश टिकैत यांचा आशावाद
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा हे आमच्यासाठी देखील आश्‍चर्यकारक होती. मात्र, सरकार योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचं हे एक सकारात्मक चिन्हं आहे. पण, संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात कायदे रद्द होईपर्यंत शेतकरी आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचा पुनरुच्चार शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत
कायदे रद्द झाले तरी किमान आधारभूत किंमतीचा मुद्दा अजूनही तसाच आहे. याबाबत केंद्र सरकार बोलायला तयार नाही. सरकारने किमान आधारभूत किंमतीबाबत बोलायला पाहिजे, असंही ते म्हणाले.

संसदेत शेतीविषयक कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. त्यानंतरही एमएसपीवर चर्चा सुरूच ठेवू. आता सर्वात मोठं प्रश्‍नचिन्ह एमएसपीबाबत आहे.
राकेश टिकैत,शेतकरी नेते

गेल्या 22 जानेवारीपासून सरकारसोबत आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. तसेच लखीमपूर खिरीच्या घटनेवेळी फक्त त्याबाबतच चर्चा झाली. त्यावेळी कृषी कायद्याचा विषय निघाला नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेली घोषणा आमच्यासाठी खूप मोठं आश्‍चर्य होतं. आम्हाला याबाबत काहीही माहिती नव्हतं, असंही टिकैत म्हणाले.

Exit mobile version