शिंदे सरकार पडणार- राष्ट्रवादी

। शिर्डी । प्रतिनिधी ।
राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडणार, असे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडणार, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी ते म्हणाले राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही. मात्र, राज्यातील सरकार कोसळणार असे पाटील यांनी केले आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार 16 आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असे बोलले जात होते. मात्र, आता पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केले आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असे ते म्हणाले.तसेच 145 चा आकडा कमी झाला की सरकार पडणार, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

शिंदे गटातील कोणी आमच्या संपर्कात नाही. मात्र नऊ-दहा आमदार आमच्याजवळ बोलत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आम्ही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तेवढा संयम बाळगत आहेत हे देखील विशेष आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Exit mobile version