निवडणुकीत महायुती विजयी

। उरण । वार्ताहर ।
नेव्हल डॉकयार्ड को ऑपेरेटीव्ह बँक या बँकेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणुकीत नेव्हल एम्प्लॉयीस युनियनचे अध्यक्ष पिताबस पाणीग्रही यांच्या नेतृत्वाखाली महायुती पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडविला आहे. २१ पैकी १९ जागांवर विजय मिळवून निर्विवाद सत्ता मिळवित बँकेवर आपले पुन्हा वर्चस्व ठेवले आहे. विरोधी पॅनल ला फक्त दोनच जागेवर समाधान मानावे लागले. या विजयासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version