खळबळजनक! ‘या’ माजी मंत्र्याच्या नातवाचा अंदाधुंद गोळीबार

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापूरमधील रंकाळा परिसरात माजी कृषी मंत्र्याच्या नातवाने शैक्षणिक संस्था आणि शेतीच्या मालकीवरून स्वत:च्या चुलत भावाच्या घराच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गोळीबाराची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर टाकल्याने या घटनेला तोंड फुटले.

माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक आणि मानसिंग यांच्यात वाद आहे. अभिषेक हा सुभाष बोंद्रे यांचा मुलगा असून मानसिंग हा विजय बोंद्रे यांचा मुलगा आहे. हे दोघेही रंकाळा तलावाच्या मागील बाजूला अंबाई टँक परिसरात स्वतंत्र राहतात. दोघांमध्ये श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि जमिनीच्या कारणावरून वाद आहे. संपत्ती आणि मालकीवरून कोर्टात दावे प्रतिदावे केले आहेत. याच कारणावरून काल सोमवारी रात्री साडेबारा वाजता मानसिंग बोंद्रे याने अभिषेक बोंद्रे यांच्या घराजवळ जात मतुला व तुझ्या खानदानाला संपवितो, तुझा गेम करतोफ अशी धमकी देत रिव्हॉल्व्हर काढले. रिव्हॉल्व्हरमधून त्याने चार फायर केले. गोळीबाराची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर टाकल्याने या घटनेला तोंड फुटले. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अभिषेक बोंद्रे यांनी मानसिंग याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मानसिंग बोंद्रे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. बोंद्रे हे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version