। खरोशी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती पेण यांच्या संयुक्त विद्यमाने खरोशी केंद्रातर्फे आयोजित क्रीडा व व्यक्तीमत्त्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवून 14 बक्षीसे जिंकून केंद्रात अव्वल स्थान पटकावले आहे. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा ज्योत पेटवून रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेत बेचकी, लंगडी, दोरी उडी, लगोरी, पारंपारिक नृत्य, समूहगीत गायन, शिल्पकला व पथनाट्य यांचा समावेश होता. यामध्ये खरोशी शाळेने बेचकीने नेम धरणे, शिल्पकला, समूहगान, पारंपारिक नृत्य, लगोरी, पथनाट्यव शून्य कचरा व्यवस्थापन या विविध स्पर्धांमध्ये लहान व मोठ्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले आहे. यावेळी, बेलवडे सरपंच, ग्रामपंचायत सदस्या, वळक सरपंच, बळवली सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.