| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पोलिसांनी वरणे आदिवासीवाडीमधील गावठी दारूची हातभट्टी लावली जाणार्या ठिकाणी धाड टाकली. तर, नेरळ पोलिसांनी बेकरे येथील कोला वॉटर फॉल भागातील हातभट्टी फोडून कारवाई केली.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत वर्णे येथे आदिवासीवाडीमध्ये गावठी दारूची हातभट्टी लावली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कर्जत पोलिसांनी 28 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता वर्णे आदिवासीवाडीच्या जंगल भागात धाड टाकली. त्यावेळी गावठी दारू तयार करण्याचे 21 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जयवंत काठे करीत आहेत.
तर, नेरळ पोलीस ठाणे हद्दीत बेकरे गावाच्या शिवारात कोला धबधबा येथे गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी 28 एप्रिल रोजी धाड टाकली. धबधब्याच्या खालील बाजूस ओहला नदीच्या किनारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीकडील 57,600/- रुपये किमतीचे साहित्य हस्तगत केले. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश बोडके हे करीत आहेत.







