। अलिबाग । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्शवभूमीवर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी रूपेश कुंडलीक पोखरकर, वय-३१ वर्षे व प्रणय नितीन पाशिलकर, वय २२ वर्षे, दो. रा निगोजे गाव, ता. खेड, जि. पुणे या अट्टल गुन्हेगारांवर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , पोलीस निरीक्षक , दयानंद गावडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक महेश कदम, पोलीस उप निरीक्षक विकास चव्हाण व पोलीस अंमलदार यांचा पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना गुन्हयातील आरोपी रूपेश कुंडलीक पोखरकर, वय-३१ वर्षे व प्रणय नितीन पाशिलकर, वय २२ वर्षे, दो. रा निगोजे गाव, ता. खेड, जि. पुणे यांच्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली. पथकामार्फत तातडीने शोध घेण्यात आला. यावेळी, सखोल तपास केला असता आरोपीनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून २ लाख रुपयांच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.