तापामानाचा पारा चढणार; पुढील पाच दिवसात उकाडा वाढणार

हवामान विभागाचा इशारा
| पुणे | प्रतिनिधी |
मागील काही दिवसांपासून उष्णतेचा कडाका वाढला आहे. परिणामी, तापमान सुरुवात झाली असून, उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचा पारा 30 अंशाच्या वर गेला असून, तो आणखी वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उष्णतेमुळे आधीच अंगाची लाहीलाही होत असताना पुढील पाच दिवस उकाडा अधिक वाढणार असून, कमाल तापमानात तीन ते पाच अंशांतनी वाढ होण्याची शक्यता हवामान वर्तविण्यात आली आहे.

यंदा ऋतुचक्र बदलले आहे. पावसाळा संपल्यानंतर पाऊस सुरु झालला होता. हिवाळ्यातदेखील थंडी गायब होऊन अधूनमधून पाऊस पडत होता. गतवर्षी मार्च महिण्याच्या अखेरच्या आठवड्यात तापमान 42 अंशावर गेले होते. यंदा मात्र, यंदा अद्याप मार्चही सुरू झालेला नसताना अनेक ठिकाणी तापमानाने चाळीशी गाठली आहे. त्यामुळे अंग भाजणारा सूर्यप्रकाश आहे. भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्‍चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात सामान्यपेक्षा तीन ते पाच अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

अजून मार्च महिना सुरूही झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता आगामी पाच दिवस वातावरणातील उष्णता आणखी वाढणार असल्याचा इशारा खात्याने दिला आहे. हवामान विभागाने सांगितलं की, मार्चच्या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत वायव्य भारतातील काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक वाढू शकतो.

Exit mobile version