। मुंबई । वार्ताहर ।
देशात गेल्या २४ तासांत ३,०१६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक आहे. यासोबतच कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १३,५०९ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, रोजाचा पॉझिटीव्हीटी रेट हा दर २.७३% वर वाढला आहे.
भारतात गेल्या २४ तासांत झालेल्यी ३,०१६ नवीन कोविड रुग्णांची वाढ कालपासून ४० टक्क्यांनी जास्त आहे. तसेच कोरोनाचा रोजचा पॉझिटीव्हीटी रेट २.७ टक्के आणि आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट १.७१ टक्के नोंदविला गेला आहे.
१४ मृत्यूंसह देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५,३०,८६२ वर पोहोचली आहे. २४ तासांच्या कालावधीत महाराष्ट्रात तीन, दिल्लीतील दोन आणि हिमाचल प्रदेशात एक आणि केरळमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.