काबूल | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तानात युक्रेनच्या विमानाचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. युक्रेनचं विमान आपल्या नागरिकांना आणण्यासाठी अफगाणिस्तानात गेलं होतं. या दरम्यान विमानाचं अपहरण झाल्याचा दावा युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. विमान हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरिकांना घेण्यासाठी उतरलं होतं आणि तिथून इराणसाठी उड्डाण केलं होतं.
गेल्या रविवारी अज्ञात लोकांनी विमान अपहरण केले होते, असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री येवगेनी येसेनिन यांनी सांगितले. युक्रेनियन लोकांबरोबर उड्डाण करण्याऐवजी, काही अज्ञात लोक त्यात चढले आणि इराणच्या दिशेने उड्डाण केले. यामुळे आमचे तीन एअरलिफ्टचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आमचे लोक विमानतळावरच पोहोचू शकत नाहीत, असं त्यांनी पुढे सांगितलं.