छंदामुळे केले परिवाराचे उदरनिर्वाह

| चिरनेर । वार्ताहर ।
प्रत्येक व्यक्तीला कोणता तरी एक छंद असतोच ,आपल्या आवडी प्रमाणे छंद जोपासला जातो. कुणाला गाणी गाण्याचा छंद असतो, कुणाला रांगोळी काढण्याचा ,कुणाला पेंटिंगचा छंद , कुणाला सायकल प्रवास करायचा, कुणाला गिर्यारोहणाचा तर कुणाला खाण्याचा अशा अनेक व्यक्ती विविध छंद आपल्या आवडीनुसार जोपासत असतात.परंतु एका अवलियाने गरिबीवर मात करून छंदातून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडातून कोरीव काम करुन विविध आकर्षक मूर्ती बनविण्याचा छंद जोपासला आहे.लाकडापासून विविध शोभेच्या वस्तू ,बनवून त्या विक्रीतून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याची जवाबदारी ते पेलत आहेत.

उरण तालुक्यातील नगरपरिषद हद्दीतील मोरा फड न.5 मध्ये राहणारे राम आत्माराम पांचाळ यांची घरची परीस्थिती अत्यंत गरिबीची,गरीबीवर मात करून त्यांनी लाकडातून विविध मूर्ती बनवून त्या विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ते करीत आहेत. आज पर्यंत त्यांनी लाकडातून धावता घोडा, छत्रपती शिवाजी महाराज, मच्छिमारी नौका,गरुड,हरण,सात घोडे,आदि मूर्ती बनविल्या आहेत.यात मच्छिमारी नौकांना विशेष मागणी असते. त्यांची कलाकुसर पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

माझे वडील दगडातून मूर्ती घडवीत असत. त्यांच्या कडून प्रेरणा घेतली व या प्रेरणेने घडलो. चित्रकलेची लहानपणापासूनच आवड असल्याने लाकडापासून मूर्ती बनविण्याचा छंद जोपासला. त्यामुळे अनेक मूर्ती बनवून त्या विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. छंदामुळे माझ्या परिवारचे उदरनिर्वाह करू शकलो -राम पांचाळ, कलाकार

Exit mobile version