दुभाजकावरील झोपड्या जमीनदोस्त

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
घरकुलकडून शिव मंदिराकडे जाणार्‍या नवी मुंबई मट्रो पुलाखाली दुभाजकावर उभारलेल्या झोपड्या पालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खारघर सेक्टर 12 मधील घरकुलकडून शिवमंदिरकडे जाणार्‍या मेट्रो पुलाखालील रस्त्याच्या कडेला काही फासेपारधी थेट दुभाजकावर झोपडी उभारून कुटुंबासह राहत होते. या झोपड्यात राहणारी मुले रस्त्यावरच खेळत. रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असल्यामुळे मुले अथवा महिला वाहनांखाली येऊन अपघाताची शक्यता होती. असे झाल्यास त्याला कोण जबाबदार? असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला होता. याविषयी खारघरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पनवेल पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन खारघर विभाग कार्यालयाने सोमवारी (ता.22) या झोपड्या जमीनदोस्त केल्या.

Exit mobile version