। अलिबाग / माणगाव । भारत रांजणकर / सलीम शेख ।
मुंबई गोवा महामार्गावर पाहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रेपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून भरधाव ट्रक आणि एको कारची समोरासमोर धडक झाली. यात तब्बल ९ प्रवासी ठार झाले असून एक ४ वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला होता परंतु मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अमोल रामचंद्र जाधव (वय ४०, रा. हेदवी, गुहाघर रत्नागिरी), निलेश चंद्रकांत पंडित (वय ४५, हेदवी, गुहाघर रत्नागिरी. सध्या रा. मुंबई), दिनेश रघुनाथ जाधव (वय ३०, रा. हेदवी, गुहाघर रत्नागिरी. सध्या रा. मालाड), निशांत शशिकांत जाधव (वय २३, रा. विरार पूर्व), दीपक यशवंत लाड (वय ६०, रा. कॉटन ग्रीन , मुंबई), स्नेहा संतोष सावंत (वय ४५, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग. सध्या रा. जोगेश्वरी), कांचन काशिनाथ शिर्के (वय ५८, रा. चिपळूण, रत्नागिरी. सध्या रा. नवी मुंबई), मुद्रा निलेश पंडित (वय १२, रा. हेदवी, गुहाघर रत्नागिरी. सध्या रा. मुंबई), नंदिनी निलेश पंडित (वय ४०, रा. हेदवी, गुहाघर रत्नागिरी. सध्या रा. मुंबई), भव्य निलेश पंडित (वय ४, रा. हेदवी, गुहाघर रत्नागिरी. सध्या रा. मुंबई) या १० जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.