लोकविकास सामाजिक संस्थेच्या महाड महोत्सव च्या मंचावरून साधला संवाद
| महाड | ईलयास ढोकले |
शालेय शिक्षण आर्मी स्कुल मधून झाले असल्याने मराठी भाषा शालेय जीवनात शिकता न आल्याची खंत व्यक्त करत मराठी भाषा सह चित्रपट मधील अभिनय सह कला मराठी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून शिकायला मिळालं असल्याचे सांगत, ‘मराठी चित्रपट सृष्टी हे शिक्षणाचे ज्ञानपीठ’ असल्याचे मत सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महाड महोत्सवच्या कलामंच वरून व्यक्त केले.
सिनेअभिनेत्री यांची मुलाखत सुधीर शेठ यांनी घेत सोनाली यांनी दिलखुलास उत्तरे दिली व 15 वर्षातील अभिनय क्षेत्रातील अनुभव विशद केला. यावेळी बोलताना सोनाली हिने आपले शालेय शिक्षण आर्मी शाळेतून झाले असल्याचे सांगत वडील आर्मी मध्ये डॉक्टर असल्याचे सांगितले, तर आई पंजाबी असल्याचे सांगत शालेय जीवनात मराठी शिकायला मिळाले नाही. वडिलांनी सांगितले की, जिथे कुठे जाशील तेथे सोबत आई सदैव उभी असेल, असे सांगत आजही माझी आई माझ्या समवेत असल्याचे सांगितले.
वडिलांनी शिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले. तुला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते कर. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पदवी पर्यंत शिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले. सोनाली हिने चित्रपट क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ते पूर्ण झाल्याचे सांगता रसिक प्रेक्षक यांच्या प्रेमापोटी व पाठींब्यावर मी 15 वर्ष या क्षेत्रात काम करत असल्याचे सांगत रसिक प्रेक्षकांना मनाचा मुजरा केला.
मराठी चित्रपट ‘बकुळा नामदेव घोटाळे’ हा पहिला चित्रपट होता. मात्र त्या पूर्वी ‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेत माझी भूमिका नर्तकी ची होती व विक्रम गोखले या मालिकेत होते. अशी आठवण सांगत रसिकांना सुसंस्कृत चित्रपट आवडत असल्याचे सांगितले. चित्रपटा मध्ये गोष्ट महत्वाची असते. नुकतंच मल्याळम भाषेत चित्रपट करत असून त्या चित्रपटात मोहनलाल याची प्रमुख भूमिका असणार आहे.
या वेळी सोनाली हिने अदाकारी संवादाच्या माध्यमातून सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. सिनेअभिनेत्री सोनाली हिचे स्वागत सत्कार पुष्पलता जगताप व हनुमंत जगताप यांनी केले.