चिरनेर गावातील महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या चिरनेर गावातील कातळपाडा ते चिरनेर प्राथमिक शाळा या अंतर्गत मुख्य रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, या रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राजिप चे सदस्य बाजीराव परदेशी तसेच उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पाटील व चिरनेर ग्रामपंचायतीच्या सदस्या सविता केणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

या मुख्य अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, या रस्त्याच्या कामासाठी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव परदेशी यांच्या प्रयत्नातून, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून, हा निधी मंजूर करण्यात आला आहे. कातळपाडा ते प्राथमिक शाळा असा सुमारे 180 मीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामामुळे चिरनेर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version