| चिरनेर | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे प्रतोद बाजीराव परदेशी यांनी रायगड जिल्हा परिषद निधीतून चिरनेर गावातील नाक्यावर तसेच मोठे भोम नाक्यावर बसविण्यात आलेल्या हायमास दिव्यांचे लोकार्पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, चिरनेर सरपंच संतोष चिर्लेकर, काँग्रेस पक्षाचे तालुका युवा अध्यक्ष राजेंद्र भगत, बापू मोकल, घनश्याम पाटील, तिरंगा पतपेढीचे चेअरमन अलंकार परदेशी, रवींद्र भगत, अमित नारंगीकर, संतोष भगत, चंद्रकांत गोंधळी,जीवन नारंगीकर, कमळाकर म्हात्रे, गणेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य किरण कुंभार, विकास म्हात्रे, किशोर केणी यांच्यासह चिरनेर, मोठे भोम गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.