। खोपोली । वार्ताहर ।
सावरोली,ता.खालापूर ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा रविवारी आम.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभागृहात एका विभागाला माजी सरपंच कै. प्रदीप लाड यांचे नाव द्यावे स हीच खरी श्रद्धांजली असेल आणि भविष्यात विकास कामांसाठी जी गरज लागेल ती देण्याचे तयारी त्यांनी दर्शविली आहे.यावेळी माजी सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे माजी ग्रामसेवक व कर्मचारी पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते नरेश पाटील, पद्माताई पाटील विश्वनाथ पाटील, अंकित साखरे, शेखर वालेकर सरपंच प्राची प्रदीप लाड उपरपंच नागेश मेहत्तर, संतोष बैलमारे सागर घोसाळकर, अमर वादळ सदस्य स्वाती प्रमोद किलंजे ,रुबिना संजय पवार,माधवी दत्तात्रेय मिरगळ, सोनल पंकज मेहत्तर, श्वेता मनवे,गटविकास अधिकारी बालाजी पुरी,टाटा स्टील कंपनी चे कुशल ठाकूर कोप्रानचे के.जी. शर्मा,मर्क कंपनीचे पराग परदेशी, फर्न्स कंपनीचे दुर्गेश चित्ता, एमटीसी कंपनीचे दिनेश झा यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष बैलमारे यांनी केले.सरपंच प्राची लाड यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन जगदीश मराजगे तर आभार ग्रामसेवक योगेश पाटील यांनी केले