पोलिस कर्मचार्‍याच्या प्रसंगावधानाने वाचवला प्रवाशाचा जीव

| पनवेल । वार्ताहर ।

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा एक प्रत्यय पनवेल रेल्वे स्थानकावर आला आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात हात निसटून प्रवासी ट्रेन खाली येत असताना पोलिस कर्मचार्‍याने प्रसंगावधान राखून प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

जावेद सलीम खान (वय 36, राहणार बंदररोड, पनवेल) यांनी पनवेल रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या नेत्रावती एक्सप्रेस मध्ये चढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या दोन्ही हातात सामान असल्याने अचानक त्याचा तोल गेला व ते ट्रेन खाली येणार एवढ्यात तिथे कर्तव्यावर असलेले आरपीएफचे दिनेश कुमार यांनी त्यांना मृत्यूच्या दाढेतून ओढून काढले. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेर्‍यात कैद करण्यात आला आहे.

Exit mobile version