खरवली बोरगाव येथील एका महिलेने सहा चिमुकल्यांना विहिरीत टाकल्याची घटना; चार मृतदेह काढले बाहेर

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

नवऱ्याबरोबर वाद झाल्याने महाड तालुक्यातील खरवली बोरगाव येथील एका महिलेने सहा चिमुकल्यांना विहिरीत टकल्याची घटना घडली असून त्यापैकी चार मृतदेह काढण्यात आले आहेत. महाड तालुक्यातील खरवली बोरगाव हद्दीमधील ही घटना असून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार चार मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले घटनास्थळी पोहोचले असून पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले असून महिलेचे नाव अथवा तिचे नवऱ्याशी कशावरून भांडण झाले यासंदर्भात कोणताही खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.

महाड बोरगाव… मृतांची नावे

रोशनी – 10
करिष्मा – 08
रेश्मा – 06
विद्या – 05
शिवराज – 03
राधा – 1.5

Exit mobile version