| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाला नवा पेहराव देण्यात आला आहे. भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक अदिदासने बुधवारी ध्वनी चित्रीकरण प्रसिद्ध केले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह अनुभवी फलंदाज विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराजसह अनेक खेळाडू दिसत आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
प्रसिद्ध भारतीय गायक रफ्तारने गायलेल्या ‘3 का ड्रीम’ या गाण्यातून पेहराव प्रसिद्ध केला. ‘ड्रीम ऑफ 3’ हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे ज्यांना 1983 ते 2011 नंतर त्यांच्या संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकताना पाहायचा आहे.