भारतीय टीमने घेतली पंतप्रधान मोदींची भेट

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारताने 2024 च्या टी-20 विश्‍वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला. टी-20 विश्‍वचषकाच्या स्पर्धेतील विजयानंतर भारतीय संघाचे आज दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी दिल्ली विमानतळावर क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल होत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. जवळपास एक ते दीड तास पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाबरोबर संवाद साधला आहे.

भारतीय संघाने 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. 17 वर्षांनंतर भारताने टी-20 विश्‍वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. संपूर्ण भारतात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आता संघ भारतात दाखल झाल्यानंतर आधी दिल्लीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Exit mobile version