सुतारवाडी नाक्यावर मासळीची आवक वाढली

। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी नाक्यावर विक्रीसाठी येणारी सुकी आणि ओल्या मासळीला सुगीचे दिवस आले असून, ही मासळी बोर्ली- मुरुड येथून टेम्पो बोर्ली-मुरुड येथील माजी सरपंच श्री. महेश चुनेकर हे विक्रीसाठी आणतात या मध्ये सुरमई, पापलेट, कर्ली, हलवा, टोल, गडगडे बोंबील, मालवणी बांगडा, मुशी, कोलंबी, सुकी मासळी, सोडे, सुकट, बोंबील तसेच अन्य मासळी विक्रीसाठी उपलब्ध असते. यापूर्वी या ठिकाणी गुरुवारी भरणारा आठवडा बाजार ही सुरु झालेला आहे. पूर्वी ओली किंवा सुक्या मासळीसाठी कोलाड धाटाव तसेच रोहा येथे नागरिकांना जावे लागत होते. त्यामुळे खर्चिक वाहनातून मासळीसाठी जाण्यापेक्षा सुतारवाडी नाक्यावर आलेली मासळी खरेदी करणे ग्रामस्थांनी पसंत केले आहे. सुतावाडीसह येरळ, धगडवाडी, सावरवाडी, दुरटोली, ढोकलेवाडी, गौळवाडी, कामथ, जामगाव, जाधववाडी, पाथरशेत, जावटे, कुडली, अंबिवली तसेच अन्य परिसरातील ग्रामस्थांना सुतारवाडी नाक्यावर येणार्‍या मासळीचा लाभ होत आहे.

Exit mobile version