गणेशाची प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील सोनसडे येथील श्री काळभैरव योगेश्‍वरी मंडळाच्या वतीने श्री गणेश प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. यावेळी लेझीम व खालुबाजाच्या तालावर गावातुन मंदिरापर्यंत गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. आरती, पुष्प वाहून मूर्तीचे मंदिरात आगमन झाले. पुरोहीत मंदार पेंडसे, मंगेश पेंडसे, विवेक बर्जे यांनी ब्रम्ह मंडळ, नवग्रह, बाहयमंडंळ यांची मांडणी करून मंत्रोच्चारात श्री गणेश स्थानापन्न करून वास्तुशांती, षडोपच्चार पुजा, होमहवन करत सर्व विधी पार पाडल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम वनगुले, महीला मंडळ अध्यक्षा कविता भोसले सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version