मुनवलीत नेत्र तपासणी, चष्मे वाटप
| सोगांव | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाची गरीब, दिन दुबळे, शेतकरी, कष्टकऱ्यांसोबत बांधिलकी आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील यांचा वारसा जपत आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी गोरगरीबांशी जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. गरीबांची मुले शिकली पाहिजे. त्यांचा आर्थिक सामाजिक विकास झाला पाहिजे या भुमिकेतून शेतकरी कामगार पक्षाने आजपर्यंत कामे केले आहेत. तळागळातील सर्व घटकांना उभारी देण्याचे काम केले आहे. शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक उपक्रमांतून जनतेची सेवा केली आहे. त्याप्रमाणे पुढेही हित साधणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील हनुमान मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे उद्घाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मंगळवार दि.17 रोजी करण्यात आले. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चित्रलेखा पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा मुनवली, सोगांव व पंचक्रोशीतील महिला व पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी विभागात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत, सावित्रीच्या लेकींना शाळेत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात सायकलींचे वाटप केले होते. त्यावेळी सावित्रीच्या लेकींनी चित्रलेखा पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत. यापुढेही मापगांव विभागात शेकापच्या माध्यमातून आरोग्य, शैक्षणिक, क्रिडा व सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्र तपासणीसाठी नेत्रतज्ञ डॉ. व सीएफटीआय टीम यांचे मान्यवरांनी स्वागत व सत्कार केले. या कार्यक्रमाला शेकापचे मापगांव ग्रा.प. सदस्य विजय भगत, माजी ग्रा.प.सदस्य मजीद कुर, जगन्नाथ पाटील, माजी उपसरपंच अशोक नाईक, गुळेकर यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकडोंना मिळाला चष्म्याचा आधार
मुनवली येथे सकाळपासून नोंदणी करण्यापासून शिबीराचा लाभ घेण्यासाठी सर्वच वयोगटातील नागरिक, महिलांनी गर्दी केली. असंख्य लाभार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर प्रत्येकाला मोफत चष्मे देण्यात आले. आजच्या महागाईमुळे चष्म्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना चष्मे विकत घेणे परवडत नाही. मात्र चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने मोफत चष्मे वाटप करण्यात आले. त्यामुळे शेकडो जणांना त्याचा अधार मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले.





