| उरण | वार्ताहर |
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग व गोपाळकृष्ण सार्वजनिक वाचनालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळकृष्ण वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए. आर. चव्हाण होते. कार्यक्रमास राजेंद्र नाईक, ॲड. पराग म्हात्रे, श्याम धारासुरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. के गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन व्ही. एस इंदुलकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचिती माळी हिने केले. कार्यक्रमास दत्तात्रय जुवेकर, वैशाली कोळगावकर, जिजा घरत, राजेश शहा, परेश मेश्री, चेतन वडके, अनुपमा कांबळे, डॉ. दत्ता हिंगमिरे ग्रंथालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.