आजाराचे कारण देत आरोपी रुग्णालयात
पेण | प्रतिनिधी |
घातक इंजेक्शन प्रकरणाचा तपास मंदावत चालल्याने पेणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.निकेश पाटील याच्यासह दुसरा आरोपी जाफर फारूक मेमन हा मालाड चा रहिवासी असून पोलीसांनी मुंबई कांदिवली परिसरातून त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस कोठडी देण्यात आली. तपासाला वेग आला पोलीसांनी आरोपीच्या सांगण्यावरून मुंबई गाठली मात्र आरोपी जाफर फारूक मेमन यांनी आपल्या छातीत दुखत आहे असे सांगून जे.जे. हॉस्पिटल गाठले या दरम्यान त्याला न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली. त्यामुळे कळत न कळत या गुन्हयाचा तपास मंदावला आहे.
आरोपी फारूक मेमन याला पोलीस कोठडी मिळाल्याने तपास कोणतीच नविन प्रगती नाही. तर यातील पहिला आरोपी निकेश पाटील हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला अजून जामिन मिळालेला नाही. 21 सप्टेंबरला पुन्हा निकेश याला जामिन अर्जावर सुनावनी असल्याचे समजते. परंतु सदरील औषध कोठून आलीत या बाबत पोलीसांच्या हातात ठोस कोणतेच धागे दोरे नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
आरोपी हे घातक स्टेरॉईड गुगलवरील एक प्रॉडक्ट कंपनी साईट इंडिया स्मार्ट यावरून मागवत होते अशी प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. या साईड वर कोणत्याही प्रकारची उत्पादन सहज उपलब्ध होत आहेत. याचाच फायदा घेऊन या प्रकरणातील आरोपी हे घातक स्टेरॉईड मागवत असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. परंतु त्यांच्याकडे असे कोणतेच ठोस पुरावे नाहीत.