। पनवेल । वार्ताहर ।
मंदिर, घर, दुकान यामध्ये चोरीच्या घटना नवीन नाही आता पनवेल तालुक्यातील मालडुंगे येथील स्मशानभूमीचे लोखंडी पोल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेले लोखंडी पोल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास मोठे कष्ट पडत असल्याने संबंधित चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.