वेळवली-खानाव ते उसरचा प्रवास खड्डयांतून

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा मार्गावरील वेळवली खानाव ते उसर पर्यंतच्या काही अंतरावर काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु, रस्ता तयार केल्यावर पडलेल्या खड्डयांची डागडूजी करण्यास कंपनीचे ठेकेदार विसरल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे काँक्रीटीकरण सुरु केलेल्या व काँक्रीटीकरण संपलेल्या भागामध्ये खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहने आपटून अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. वेळवली खानाव ते भेरसे खानाव तसेच उसर पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास खडड्यातूनच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाजने - बेलोशी रस्त्याला तळ्याचे स्वरुप
अलिबाग तालुक्यातील महाजने ते बेलोशी हा दोन किलो मीटरचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या रस्त्याची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. अनेकवेळा ग्रामस्थांनी मागणी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अवकाळी पाऊस गेल्या चार दिवसांपासून पडत आहे. या पावसामुळे महाजने - बेलोशी रस्त्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासाला खिळ बसत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
Exit mobile version