करंजाडे परिसर मुलभूत समस्यांनी त्रस्त

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
करंजाडे वसाहतीमधील नागरिक विविध समस्यांनी रहिवाशी त्रस्त आहेत. येथे पाण्याचा तुटवडा असल्याने पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. करंजाडे नोड फ्लैट्स ओनर्स वेल्फेअर असोसिएशनने याबाबत सिडकोकडे तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने येथील रहिवासी संतप्त झाले आहेत.

करंजाडे वसाहतीमधील सेक्टर 3 मध्ये भूखंड क्रमांक 24 ते 31 तसेच येथील रस्त्याची दुरवस्था आहे. पाऊस पडत असल्याने विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. रस्त्यावर चिखल व खड्डे पडल्याने यातून मार्ग काढवा लागत आहे. रस्त्यासोबत वसाहतीमधील मलनिस्सारण वाहिनी आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेले नाले तुंबत असल्याने खराब पाणी रस्त्यावर साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून रहिवाशी सध्या मलेरिया व साथीच्या रोगांनी त्रस्त झाले आहेत. या वसाहतीची तहान भागविण्यासाठी 14 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून सात दशलक्ष लिटर पाणी वसाहतीमध्ये पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई आहे. असे असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version