| खरोशी | प्रतिनिधी |
पेण येथे युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशन इंडिया या संस्थेच्या वतीने पेण येथील नगरपालिका मैदानात यलो बेल्ट ते ब्लॅक ब्राऊन बेल्ट पर्यंतच्या विद्यार्थ्यांची बेल्टपरीक्षा घेण्यात आली. यामध्ये 98 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदरची परीक्षा युनाइटेडचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, उपाध्यक्ष रविंद्र म्हात्रे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी मुख्य परिक्षक ओसेन्साय विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेन्साय निलेश ओव्हाळ प्राजक्ता तेटमे अयुष पाटील, स्वरांगी घैसास, रितुल म्हात्रे, हर्षाली पेणकर, महमद अली, अयुष रसाळ, अयेशा बेगम, भक्ती भानुसकर, रितेष पवार, दिपेश जाधव, पार्थ निकम, ओजस म्हात्रे, आर्यन म्हात्रे ह्यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले सर्व बेल्ट परिक्षेत उतिर्ण झालेल्या विद्यार्थाना बेल्ट व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.
पेण येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न
