कर्जत नगर परिषदेची सभा विविध प्रश्‍नानी गाजली

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार (18) नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत नगर परिषदेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, विषय पत्रिकेवर नसलेल्या मात्र नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांवर जोरात चर्चा झाली. सभेस विषय पत्रिकेवर 16 विषय ठेवण्यात आले होते. सभेस उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका संचिता पाटील, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, वैशाली मोरे, मधुरा चंदन, भारती पालकर, ज्योती मेंगाळ, पुष्पा दगडे, सुवर्णा निलधे, स्वामिनी मांजरे, नगरसेवक नितिन सावंत, राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, विवेक दांडेकर, शरद लाड, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, संकेत भासे, हेमंत ठाणगे उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस सभापती राहुल डाळींबकर यांनी नगरपरिषदेस देशात पाचवा क्रमांक मिळाला त्याबद्दल सर्व सफाई कामगार, कर्मचारी, मुख्याधिकारी, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. रायगड जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेस अभिनंदनचे प्रशस्तीपत्र पाठवले त्याचे वाचन सभागृहात करण्यात आले. दिवाळी पूर्व सानुग्रह अनुदान, बाजार पेठेतील फेरीवाले, सफाई कर्मचारी, पाणी कमी दाबाने येणे, अतिक्रमण या अनेक प्रश्‍नावर सभागृहात मांडले गेले.

Exit mobile version