भारत जोडो यात्रेत श्रमजीवी संघटना सहभागी

| अलिबाग | प्रतिनिधी |

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी सुुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत रायगडमधील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या उल्का महाजन या आपल्या सहकार्‍यांसह सहभागी झाल्या.

यावेळी त्यांनी राहूल गांंधी यांच्यासमवेत विस्थापन व जमीन संपादन या विषयावर आपले मत मांडले. शिवाय श्रमजीवीतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेली माती एका सुंदर मडक्यातून राहुल गांधीना भेट दिली. जमीन, पाणी, समुद्र ही निव्वळ खरेदी विक्रीची गोष्ट नाही. करोडो लोकांचा जगण्याचा आधार आहे, पर्यावरण संतुलनातील महत्वाची बाब आहे व अन्नसुरक्षे साठी आवश्यक आहे. ही जिवंत माती आहे. तसेच दर्याचे पाणी एका जार मधून भेट दिले असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

हे जतन होईल अशी दिशा पुढील नियोजनात रहावी या अपेक्षेसह व या मांडणीची आठवण म्हणून ही भेट दिली. अशी माहितीही उल्का महाजन यांनी दिली.
हे सुंदर मडके रंगवले, सजवले होते सोपान सुतार यांची मुलगी प्रेरणा हिने. या शिष्टमंडळात ब्रायन लोबो, लालमन धांडेकर, गिरीश साळगावकर, व पूनम कनोजिया, सत्यजित चव्हाण होते.

Exit mobile version