मविआचे मित्रपक्ष एकवटले
| खोपोली | वार्ताहर |
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे. सोमवारी दि. 7 ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पदार्पण करणार आहे. या यात्रेला समर्थन देण्यासाठी रविवारी खोपोलीत शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते खोपोली शहर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी पदयात्रा काढण्यात आली. यात महाविकास आघाडीतील सर्व राजकीय मित्र पक्ष पदाधिकारी सहभागी भारत माता की जय, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा दिल्या आहेत.
भारत जोडो पदयात्रेत खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष रिचर्ड जॉन, शेकाप जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कर्जत मतदारसंघ संपर्क प्रमुख डॉ सुनिल पाटील, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनेष यादव, युवक अध्यक्ष अतुल पाटील, महिला अध्यक्ष सुवर्णा मोरे, माजी नगरसेवक तुकाराम साबळे, महादू जाधव, काँग्रेसचे महिला शहर अध्यक्षा रेखा जाधव, इंटकचे अध्यक्ष अरूण गायकवाड, युवक अध्यक्ष तय्यब शेख, प्रसिद्धी प्रमुख सागर जाधव, शेकाप शहर चिटणीस अविनाश तावडे, वरिष्ठ पदाधिकारी श्याम कांबळे, कैलास गायकवाड, रवी रोकडे, जयवंत पाठक, माजी नगरसेवक दिलीप पुरी, नितीन मोरे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या पदयात्रेत सामील झाले होते.
शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयास अभिवादन करून ही यात्रा सुरू झाली. मुंबई -पुणे महामार्गावरून खोपोली बाजारपेठ मार्गे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयास अभिवादन करून याठिकाणी सभेचं स्वरूप दिले.
देशात संवेदनशील मार्गाने निघालेल्या यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन शेकाप नेते शाम कांबळे यांनी व्यक्त केले. सन -2014 पासून देशात भयाचं, माणसांना घाबरवण्याचं, माणसांच्या मूळ मुद्दयांना भरकटवून अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नको ते मुद्दे घेवून देशाचे तुकडे करण्याचे काम सुरू आहे. ज्याच्या खांदांनाने भारतातील लोकांना एकत्र करून चळवळ निर्माण करीत राजे, नवाब यांचे राज्य बदलून 1947 साली स्वतंत्र भारत निर्माण केले आहे. परंतु भारताच्या स्वातंत्र्यात जे झाले नाहीत ते आज राष्ट्रभक्ती शिकवतात असा टोलाही कांबळे लगावत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे असे अवाहन केले. डॉ सुनील पाटील यांनीही गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून भारत जोडो यात्रेचा उद्देश व हेतू बाबत सविस्तर माहिती देत या यात्रेला तसेच राहुल गांधी यांना समर्थन दिले.
काँग्रेसचे खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जाँन यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार व्यक्त केले.