| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कामोठे परिसरात असणार्या खाडी पात्रात रविवारी ( दि.6) कांदळवन सरंक्षण समिती, कामोठे व मॅन्ग्रोव्ह सोल्जर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कांदळवन स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली होती.
कामोठे शहरातील सेक्टर 36 लगतच्या कांदळवनात मोठ्या प्रमाणात डेब्रिज, घरगुती कचरा टाकल्याचे समितीच्या निदर्शनास आले. या मोहिमेत जवळ पास 70 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर तेरणा इंजीनियरिंग अणि सरस्वती इंजीनियरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, वनविभागाच्या वतीने मंगल ओव्हळ अणि पंचशीला कांबळे (वनरक्षक) अणि पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेदरम्यान खाडी परिसरातील डेब्रिज, बायो मैडिकल वैस्ट, प्लास्टिक, घरगुती कचरा, निर्माल्य मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आले.
कांदळवन सरंक्षणासाठी खाडी परिसरात कचरा न टाकण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे, तसेच कचरा टाकता येऊ नये म्हणून खाडी लगत सरंक्षक जाळी बसविण्यासाठी समितीच्या वतीने पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिम घेण्याचे समितीचे नियोजन आहे.
ह्या मोहिमेत धर्मेश बराई, डॉ.अरुणकुमार भगत, रंजना सडोलीकर, मंगेश अढाव , बापु साळुंखे, स्वप्निल काटकर, विलास कलंगे, नीरव नंदोला, जयश्री झा, संगीता पवार, गीता कुडाळकर, शुभांगी खरात, खुशी सावर्डेकर, महेंद्र जाधव, देवानंद बाठे, संदिप इथापे, सुनिल आडे, सचिन खरात, शुभम पवार, सत्यविजय तांबे, अशोक जेथे ह्यांच्या सह कामोठे कॉलनी फोरम, दिशा महिला मंच अणि इतर सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.
मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट
कांदळवन स्वच्छता मोहिमे दरम्यान मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा सापडला असून, जैवावीधतेला अपयकारक औषदानचा व इंजेक्शन सिरीजचा मोठ्या प्रमाणात साठा कांदलवनात सापडून आल्याने, अशा प्रकारे वैद्यकीय कचरा कांदळ वनात टाकणार्यांविरोधात कारवाई होणे अपेक्षित असल्याचे मत मोहिमेत सामील असलेले माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी व्यक्त केले आहे.