| महाड | प्रतिनिधी |
सर्वसामान्यांकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजना जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा फायदा समाजातील गरिबातल्या गरीब कुटुंबीयांना मिळाला. नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी भाजपच्या कामगार मोर्चातर्फे महाडमध्ये धन्यवाद मोदीजी अभियान आयोजित करण्यात आले.
भाजपच्या कामगार मोर्चातर्फे महाड येथील वेलकम हॉटेलच्या सभागृहा आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे हे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाड औद्योगिक वसाहती मधील कामगारांच्या समस्या सोडवण्याची आश्वासन दिले. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बिपिन महामुणकर, जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, अमोल सुंभे, निलेश तळवटकर, महेश शिंदे, श्वेता ताडपळे, रवींद्र पाटील, हेमंत पाटील, जितेंद्र निंबाळकर आदी मान्यवरांसह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जयवंत दळवी, बिपीन महामुनगर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला महाड तालुक्यातील असंख्य लाभार्थी कामगार उपस्थित होते.