| नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिटमधील एच आर विभाग तसेच सीएसआर विभागाच्या माध्यमातून नागोठणे विभागातील गावागावांमध्ये तसेच वाड्यांवर विविध समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
कंपनीच्या सामाजिक दायित्वाचाच एक भाग म्हणून नागोठण्याजवळील वरवठणे गावातील भविष्यात वरवठणे गावाच्या वैभवात भर टाकणार्या प्राचीन तलावातील गाळ काढणे व साफसफाई करण्याच्या कामासाठी नागोठणे युनिट अध्यक्ष शशांक गोयल, चेतन वाळंज, गौतम मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे व सीएसआर विभागाच्या वरदा कुलकर्णी यांच्या सहकार्याने रिलायन्स कंपनीच्या सीएसआर विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवार (दि.4) गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ऋतुजा म्हात्रे, विजय पाटील, किशोर म्हात्रे, गणपत म्हात्रे, महिला सदस्या यांच्यासह वरवठणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.