भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात शनिवारी (दि.21) रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, शिक्षण महर्षी, स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते, कला विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी स्व.प्रभाकर पाटील यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. डॉ. नम्रता पाटील यांनी, जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विकासामध्ये भाऊंच्या योगदानावर आपले विचार मांडले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गिते, समन्वयक प्रा. मिलिंद घाडगे तसेच सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version