मुलांच्या नशिबीही बिगारीचे काम
| रसायनी | वार्ताहर |
रसायनी, पाताळगंगा परिसरात नाका कामगार म्हणून काम करणार्या सर्वांचेच जीवन असुरक्षित असून,मुलांच्याही नशिबीही बिगारीचेच काम असल्याचे वास्तव समोर आले आहे. रसायनी, पाताळगंगा भाग हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात नव्याने उभी राहणारी गृहसंकुले, औद्योगिक वसाहत, महाविद्यालये आदी कामांकरिता ठेकेदारांकडे बिगारी कामे निघत आहेत. या कामांकरिता नाका कामगार मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यांना रोजंदारीचे चांगले आमिषही दाखविले जात आहे, मात्र त्यांच्या हक्काचे पैसे देण्याची वेळ येते. त्यावेळी त्यांना भांडल्याशिवाय ते पैसे मिळत नसल्याचे वास्तव आहे.
हक्काच्या रोजगारासाठी कष्ट
कष्टाच्या, बिगारी कामासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागातील माणसे काम मिळेल या अपेक्षेने सकाळी साडेसात वाजल्यापासून परिसरातील मोहोपाडा मिनीडोअर असल्याने मोहोपाडा व वावेघर नाका थांब्याजवळ तसेच वावेघर नाक्यावर उभे असतात. या नाका कामगारांना दिवसाकाठी 600 रुपये हजेरी मिळते. यामुळे कामगारांना बिगारीला 250 अशी मजुरी मिळत हक्कासाठी झगडावे लागत आहे.बिगारी 350 ते 400 व महिला वेठबिगारी नाका कामगारांच्या पाचवीला पुजला आहे. बांधकाम क्षेत्रात राहून लोकांची घरे उभारणारे मिळत असले तरी दाम मात्र भांडून घ्यावे लागत आहे.मोहोपाडा नाका सकाळी फुलून गेलेला असतो.
बिगारीचे काम करताना बहुमजली इमारतींच्या कामावर जीव, धोक्यात घालून लक्ष द्यावे लागते. या नाका कामगारांचे जीवन असुरक्षित असून या कामगारांना शासनाच्या किमान वेतन व इतर सुविधा मिळणे गरजेचे आहे. कामाची हमी नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील भेडसावत असल्याने मुलांच्या नशिबीसुध्दा बिगारी काम असल्याची स्थिती निर्माण झाल्याचे नाका कामगारांचे सध्या नाक्यानाक्यावर सकाळच्यावेळी हे कामगार उभे असताना दिसत आहेत. झोपड्या उभारून काही कुटुंबे जीवन जगताना दिसतात. काही ठेकेदार या बिगारीचे काम करणार्या कामगारांना वेठबिगारीप्रमाणे राबवून घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.