बुडणाऱ्या दाम्पत्यांचा जीव वाचला

महाजने येथील दोन तरुण धावून आले

|रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील महाजने येथील नदीत वयोवृद्ध दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहात वाहत होते. ते पाण्यामध्ये बुडणार होते. ही बाब जवळ असलेल्या गावातील दोन तरुणांच्या निदर्शनास आली. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या नदीत उडी मारून वयोवृद्ध दाम्पत्यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले.

रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुख्य नद्यांसह वेगवेगळ्या गावातील नद्या देखील पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. दुथडी भरून पाणी नद्यांमधून वाहत आहेत.
एका आदिवासी वाडीवरील महिला व पुरुष हे वयोवृद्ध रविवारी (दि.५) सकाळी नदीच्या प्रवाहात वाहत असताना दिसून आले. नदी जवळच असलेल्या सुभाष औचटकर व प्रेमनाथ पारंगे
या दोन तरुणांनी धाव घेऊन नदीत उडी मारली. त्यांनी दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. या दोन तरुणांमुळे वयोवृद्ध दाम्पत्यांचा जीव वाचला.

Exit mobile version